काय हो !"कोच्छी' जलप्रकल्प गेला कोठे?

सावनेर ः निधीअभावी रखडलेला कोच्छी प्रकल्प.
सावनेर ः निधीअभावी रखडलेला कोच्छी प्रकल्प.

सावनेर (जि.नागपूर)  : सावनेरकरांना सिंचनाची व नागपूरकरांना पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कन्हान नदीवरील कोच्छी बॅरेज जलप्रकल्प अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. प्रकल्प बांधकामासाठी निधी देण्यास विलंब करीत असल्याने येथील बांधकामाला बैलबंडीची गती दिसत आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी परत 120 कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे समजते. त्यामुळे मागील 23 वर्षांपासून बांधकामाचा शुभारंभ झालेला हा प्रकल्प परत रखडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

जिल्ह्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प परत रखडणार!
उन्हाचे चटके लागताच पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी झळ सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रकल्प तातडीने पूर्ण करणे आवश्‍यक असल्यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हरितक्रांतीसाठी वरदान ठरू शकणारा हा जलप्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. जिल्ह्यातील सिंचनक्षमता दिवसेंदिवस घटत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेला कष्टकरी शेतकरी व त्याचे कुटुंब भाजीपाला शेती, फळ शेती किंवा इतर रब्बीची पिके घेताना कोरड्या पडलेल्या विहिरी तहानलेल्या तलावामुळे अपुरी सिंचन व्यवस्था जनावरांना चारापाणी उपलब्ध होत नसल्याने जनावरे विक्रीला काढण्यासारख्या अशा बिकट स्थितीत जनता असल्याने कोच्छी बॅरेज जलप्रकल्प जलदगतीने व्हावा यासाठी शासनाला लक्ष देण्याची गरज आहे.


जिल्ह्यातील नंदनवन ठरणाऱ्या कोच्छी बॅरेज जलप्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1994 ला प्रशासकीय मंजुरी दिली. 2006 मध्ये आमदार सुनील केदार यांच्या अथक प्रयत्नांनी या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली. तेव्हापासून प्रकल्प बांधकामाला पुरेसा निधी देण्यास चालढकल केली जात आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये ः
जिल्ह्याच्या सावनेर तालुक्‍यातील खेकरानाला जलप्रकल्पालगतच्या परिसरातील कोच्छी गावाजवळ असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात हा जलप्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाचा खर्च 947 कोटी इतका असून प्रकल्प पूर्ण करायला 120 कोटी रुपये निधीची आवश्‍यकता आहे. या प्रकल्पामुळे 3,980 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे शिवाय नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराला पाणीपुरवठा होणार असल्याने येथील पाणीसमस्या मार्गी लागणार आहे. तसेच परिसरातील भूजलपातळी वाढून शेती सिंचनासाठी याचा लाभ होणार आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला पिण्याचे पाणी काही प्रमाणात दिल्या जाणार आहे. कोरड्या विद्युत केंद्राला 14.00 दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्यात येणार आहे.

पुरेसा निधी मिळाला नाही !
शासन कोणतेही असो, विदर्भाच्या प्रश्नांवर चालढकल केली जात आहे आणि म्हणूनच या प्रकल्पाला आजपर्यंत पुरेसा निधी वेळेत दिला नाही.
संजय टेंभेकर
शेतकरी, उमरी

प्रकल्प फायद्याचा !
हा प्रकल्प सावनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी, उद्योगांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.
छायाताई बनसिंगे, सामाजिक कार्यकर्त्या, कोच्छी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com