esakal | "ती'' शाळाबाह्य मुले गेली कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

"ती'' शाळाबाह्य मुले गेली कुठे?

sakal_logo
By
प्रभाकर कोळसे

नंदोरी (वर्धा) : एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या वर्षीही सरल प्रणालीत सारखी असायला पाहिजे; परंतु सध्या सरल प्रणालीत तफावत दिसून येत आहे. मग हे विद्यार्थी गेले कुठे, हे शोधण्यासाठी शिक्षण विभागाने "मिशन झिरो ड्रॉप बॉक्‍स' योजना सुरू केली आहे. या माध्यमातून ही संख्या शून्यावर आणण्याचा उपक्रम शिक्षण विभाग राबवीत आहे.
बऱ्याच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत नववी, अकरावीत विद्यार्थिसंख्या भरपूर असते; मात्र दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला हे विद्यार्थी परीक्षेला बसतच नाही, असे दिसून येते.
विद्यार्थी, शिक्षक संख्या टिकविण्यासाठी शाळा काही काळेबेरे तर करीत नाही ना किंवा शाळा सरल प्रणालीकडे मुलांचे प्रमोशन, रिक्‍वेस्ट सेंड करणे, अप्रूव्ह करणे याकडे दुर्लक्ष तरी करते किंवा काय, असे नागपूर विभागातील पहिली ते बारावीच्या एक लाख 29 हजार 907 विद्यार्थ्यांच्या पेंडिंग रिक्‍वेस्टवरून दिसून येते. याकरिता शिक्षण विभागाने "मिशन झिरो ड्रॉप बॉक्‍स' सुरू केले आहे.
नागपूर विभागात इयत्ता पहिली ते चौथीचे 81 विद्यार्थी, इयत्ता पाचवी ते दहावीचे 58 हजार 822 विद्यार्थी व इयत्ता अकरावी ते बारावीचे 71 हजार 4 विद्यार्थी सरल प्रणालीत ड्रॉप बॉक्‍समध्ये आहेत. तसेच नागपूर विभागातील 808 मुले व 584 मुली अशा एकूण 1392 शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार आहे. विभागात शाळाबाह्य मुले सर्वांत कमी भंडारा जिल्ह्यात 12, तर सर्वांत जास्त चंद्रपूर जिल्ह्यात 1074 आहेत. यात शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी शिक्षण विभागाने "मिशन झिरो ड्रॉप बॉक्‍स' निरंक करण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन दिली आहे.

loading image
go to top