जिल्ह्यात 611 बालके कुपोषित बालकांचा पोषण आहार जातो कुठे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नागपूर -  केंद्रातील आणि राज्यातील वजनदार नेत्यांचा जिल्हा असला तरी नागपूरमध्ये तब्बल 611 बालके कुपोषित आढळले आहेत.

कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासनाकडून शेकडो उपाययोजना राबविल्या जात आहे. लाखोंचा निधी खर्च केला जात असताना बालकांचा पोषण आहार जातो कुठे, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आकडेवारीवरून शासकीय योजना फक्त कागदोपत्री राबविल्या जात असल्याचे स्पष्ट होते.
पौष्टिक आहाराअभावी अनेक बालके कुपोषणाचे बळी ठरत आहेत. विशेषत: ग्रामीण परिसरातील आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे.

त्याकरिता सहा महिन्यांच्या गरोदर महिलेपासून बाळंतीण महिलेला पौष्टिक आहाराचे पॅकेट देण्यात येते. त्याचप्रमाणे शून्य ते पाच वर्षे वयाच्या मुलांना पौष्टिक आहार दिला जातो. आदिवासी भागातील मुलांसाठी "अमृत' योजना सुरू करण्यात आली. मात्र, यानंतरही कुपोषण कमी होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागपूर जिल्ह्यात शून्य ते सहा वर्षे वयोगाटातील 611 बालक कुपोषित आहेत. यातील 476 बालके तीव्र कुपोषित तर 135 बालक अतितीव्र कुपोषित आहेत. कमी कमी वजनाची 10 हजार 906 बालक आहेत.

तालुकानिहाय बालके
पारशिवनी : 108
रामटेक : 52
काटोल : 18
कळमेश्‍वर : 95
सावनेर : 47
भिवापूर : 14
नरखेड : 25
कुही : 57
उमरेड : 39
हिंगणा : 30
नागपूर ग्रामीण : 63
मौदा : 25
कामठी : 74

Web Title: Where is feeding malnourished children