
अविनाश साबापुरे
यवतमाळ : शालेय अभ्यासक्रमात कृषीशास्त्राचा समावेश करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी आणला गेला. त्याचे सर्वस्तरातून स्वागतही झाले. पण आता नवे शैक्षणिक सत्र उंबरठ्यावर आले, पाठ्यपुस्तके छापून तयार झाली, तरी कृषी विषयाच्या समावेशाबाबत कुठेही हालचाल नाही. त्यामुळे या विषयाचे घोडे नेमके कुठे अडले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.