MMP Company Explosion : तुम्हीच सांगा साहेब, या स्फोटाला जबाबदार कोण? मृतांचे नातेवाईक व ग्रामस्थांचा सवाल
Explosion Victims : एम.एम.पी. कंपनीच्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी कंपनीला जबाबदार ठरवले आहे. हृदय पिळवटणारी सून, "आमच्या लेकराला कुठे चुकलं?" असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
धुरखेडा : माझं लेकरू सकाळी कामाला गेलं आणि सायंकाळी त्याचा चेहराही व्यवस्थित पाहता आला नाही. आमच्या लेकराचं कुठं चुकलं साहेब? एका मातेचा हा कातर आवाज शनिवारी एम.एम.पी.कंपनीच्या गेटवर ऐकू आला.