maharashtra vidhansabha 2019 : आज भाजपच्या मेगा भरतीत नागपूरमधून कोण जाणार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर : भाजपची आणखी एक मेगा भरती रविवारी (ता. 22) मुंबईत होऊ घातली आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातून कोण जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्या अफवाच ठरल्या. आता यात जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांचे पुत्र, युवा नेते यांच्या नावाची भर पडली आहे.

राज्यभरात मोठमोठे नेते भाजपमध्ये दाखल झाले. यात विधासनभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून तर अलीकडेच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये येणारे उदयनराजे भोसले यांचाही समावेश आहे. मात्र, या भरती प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातील एकाही नेत्यांचा समावेश नाही. याउलट भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोडमारे भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहे.
आता विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने नागपूर जिल्ह्यातून काही नेते आपल्याकडे खेचून भाजप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. संबंधितांसोबत संपर्क साधला असता त्यांनी या अफवा असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये जाणारे बडे नेते कोण, याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे.
संभाव्य उमेदवार भाजपमध्ये गेल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो. याशिवाय विधानसभा लढण्यास इच्छुक असलेल्यांचेही खच्चीकरण होऊ शकते. हाच हिशेब लावून भरतीत नागपूरचा क्रमांक शेवटी ठेवण्यात आला असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will go for BJP's mega recruitment from Nagpur today?