esakal | पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून; शारीरिक संबंधास नकार दिल्याने घात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शारीरिक संबंधास नकार; पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे रविवारी (ता. दहा) सकाळच्या सुमारास घडली. दीक्षा संतोष ठाकरे (वय ३०, रा. पंगडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संतोष ठाकरे (वय ३५, रा. पंगडी) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने शनिवारी रात्री पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिला. रविवारी सकाळी पतीने पुन्हा ‘शारीरिक सुख देत नाही, अपमानजनक बोलते’ असे म्हणत वाद घातला. राग अनावर झाल्याने पत्नीच्या मानेवर, डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. यात विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: तुमच्या या सवयी ठरू शकतात डिप्रेशनला कारणीभूत

या घटनेची माहिती पतीनेच घाटंजी पोलिसांना दिली. शारीरिक संबंधास नकार दिल्याने घात केल्याची कबुली पती संतोष ठाकरे याने पोलिसांत दिली. महिलेला सात वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पत्नीच्या खूनप्रकरणी संतोषविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घाटंजी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर भुजाडे करीत आहे.

loading image
go to top