
गडचिरोली : अनेक पर्यटक रानटी हत्तींचे दर्शन करायला केरळ, कर्नाटकात वगैरे जातात पण गडचिरोलीकरांचे दर्शन घ्यायला रानटी हत्ती थेट शहरातच येत आहेत. शनिवार (ता. २४) मध्यरात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास दोन तरुण सुळेवाले (टस्कर) नर हत्ती शहरात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता रानात नाही, तर थेट गडचिरोली शहरातच रानटी हत्ती दिसले.