Monsoon Crisis in Rural Areas : पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावली, मात्र पेरणीनंतरच गायब झाला. यामुळे कपाशीचे उगम सुकले व दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
शितलवाडी : यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन आठवडे दररोज अधूनमधून कधीही पाऊस कोसळत होता. त्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावसाने पुन्हा हजेरी लावली.