Amravati News : महिलेचा मुलीसह जीव देण्याचा प्रयत्न; मृत कर्मचाऱ्याच्या दोन बायकांच्या वादात मनपा अडचणीत
Municipal Corporation : मृत मनपा कर्मचाऱ्याच्या दोन पत्नींमध्ये वाद निर्माण झाल्याने प्रशासन अडचणीत आले. या वादातून पहिल्या पत्नीने मुलीसह जीव देण्याचा केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तो रोखला.
अमरावती : मृत कर्मचाऱ्याच्या दोन बायकांमधील वादात मनपा प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. हा वाद सोडविण्यात आला असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी पहिल्या पत्नीने केलेले आरोप व दावे, यामुळे पुन्हा नवा वाद तयार झाला आहे.