Yavatmal Crime : दुचाकीत बंदूक घेवून फिरणाऱ्या महिलेला अटक; एक जिवंत काडतूस आणि बंदूक जप्त

दुचाकीच्या डिक्कीत बंदूक घेवून फिरणाऱ्या एका महिलेला एलसीबी पथकाने ताब्यात घेतले.
Gun Seized
Gun Seizedsakal
Updated on

यवतमाळ - दुचाकीच्या डिक्कीत बंदूक घेवून फिरणाऱ्या एका महिलेला एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. तिच्याकडून एक जिवंत काडतूस आणि बंदूक जप्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता. १०) यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनदेव देवस्थान परिसरात करण्यात आली.

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, यवतमाळ तालुक्यातील माळम्हसोला येथून दुचाकी मोपेड (क्र. एमएच-२९-झेड-७५६५) ने यवतमाळकडे येणाऱ्या महिलेकडे बंदूक (देशी बनावटी पिस्टल) असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती.

त्यावरून सोमवारी याबाबत वरिष्ठांना माहिती देत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यवतमाळ-आर्णी मार्गावर सापळा रचला. अश्यात माळम्हसोलाकडून येणाऱ्या संशयीत महिलेला थांबवून एलसीबी पथकातील अधिकारी, कर्मचारी असल्याचा परिचय देण्यात आला.

त्यानंतर महिलेच्या मोपेड वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये बंदूक (देशी बनावटी पिस्टल) आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी एलसीबी पथकाने बंदूक (देशी बनावटी पिस्टल), एक जिवंत काडतूस आणि मोपेड वाहन असा एक लाख एक हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com