हृदयद्रावक! आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ४ वर्षांच्या मुलासह बापाचा महामार्गावर टाहो

नंदूप्रसाद शर्मा
Sunday, 18 October 2020

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये महिला जागीच ठार झाली, तर पती अन् ४ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला. मात्र, आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुलगा रडायला लागला. ते पाहून पतीनेही टाहो फोडला. 

गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मासुलकसा घाटाजवळ रविवारी (ता. १८)सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये महिला जागीच ठार झाली, तर पती अन् ४ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला. मात्र, आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुलगा रडायला लागला. ते पाहून पतीनेही टाहो फोडला. 

हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

दुर्गा वर्मा (३०), असे मृत महिलेचे नाव आहे. ती, तिचा पती हेमलाल वर्मा (४०) आणि मुलगा तिघेही नागपूरवरून छत्तीसगडमधील राजनांदगावला दुचाकीवरून जात होते. मासुलकसा घाटाजवळ पोहोचताच अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील संतुलन बिघडून पती आणि मुलगा रस्त्याच्या कडेला पडले, तर पत्नी महामार्गावर पडल्याने मागून येणाऱ्या वाहनाच्या चाकात सापडली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. त्यावेळी वर्मा हे आपल्या ४ वर्षाच्या मुलासह घटनास्थळी टाहो फोडत होते. ते पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले. देवरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास देवरी पोलिस करत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman died in accident at deori of gondia