रस्त्यातच झाली महिलेची प्रसूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women delivery

गडचिरोली जिह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात अद्यापही पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसून येथील एका गावातून तालुक्यात प्रसूतीसाठी दुचाकीवर येत असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली.

रस्त्यातच झाली महिलेची प्रसूती

भामरागड (जि. गडचिरोली) - जिह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात अद्यापही पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसून येथील एका गावातून तालुक्यात प्रसूतीसाठी दुचाकीवर येत असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली.

भामरागड येथून १४ ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरकमेटा या गावातील नीला दिनेश वेळदा, तिचा पती दिनेश कालू वेळदा व एक महिला हे मोटरसायकलने शुक्रवारी (ता. २९) सकाळी सहा वाजता भामरागडला प्रसूतीसाठी येत असताना. भामरागड जवळील नदी जवळ अचानक पोटात दुखू लागल्याने नीला वेळदा रस्त्याच्या बाजूला जाताच तिची तिथेच प्रसूती झाली.

बाळंत होताच नीला वेळदा हिने स्वतःच आपल्या मुलाची नाळ कापली. सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या लोकांना हे दृश्य दिसतात त्यांनी १०८ क्रमांकावर फोन करून.भामरागड रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावली. महिलेची व बाळाची प्रकृती ठीक आहे.

Web Title: Woman Gave Birth On The Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top