महिलेला १० मिनिटांतच लशीचा दुसरा डोस, गोंदियातील घटना

corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

गोरेगाव (जि. गोंदिया) : चोपा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (chopa primary health center) येणाऱ्या गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (ता.18) कोव्हॅक्‍सिनचा पहिला डोस (first dose of covaxin) टोचण्यासाठी लसीकरण केंद्र (vaccination center) लावण्यात आले होते. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या अनुसया केवलचंद पारधी (वय 62) यांना आरोग्यसेविकेने एकापाठोपाठ दोन डोस दिले. सद्यःस्थितीत या महिलेची प्रकृती सामान्य आहे. पण 15 दिवसांनंतर परिणाम दिसतील, असे तज्ज्ञ डॉक्‍टरांनी सांगितल्याने मुलगा विजय पारधी घाबरला असून, पोलिसांत तक्रार करण्याची तयारी दाखवली आहे. (woman got second dose in 10 min after first dose of covxine in goregaon of gondia)

corona vaccination
ऐन उन्हाळ्यात एसी आणि कूलरचा व्यवसाय लॉक; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

कोरोना संक्रमणापासून बचावासाठी सरकारने 45 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. तथापि, प्राथमिक आरोग्य केंद्र चोपाअंतर्गत येणाऱ्या गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (ता.18) लसीकरण केंद्र लावण्यात आले होते. गावातील महिला, पुरुष जिल्हा परिषद शाळेत एकत्र आले होते. लसीकरण करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्या अनुसया पारधी आल्या. त्यांना कोव्हक्‍सिनचा पहिला डोस देण्यात आल्यानंतर शाळेतच थांबण्याचा सल्ला आरोग्यसेविका मेश्राम, तिलकवार यांनी दिला. त्यामुळे अनुसया शाळेत थांबल्या. पुन्हा 10 मिनिटांनी पुन्हा अनुसया पारधी यांना आरोग्यसेविका मेश्राम यांनी बोलावून दुसरा डोस देण्याची तयारी केली. यावर अनुसया पारधी यांनी कोव्हक्‍सिनचा डोस घेतल्याचे सांगितले. पण याकडे आरोग्य सेविकेने दुर्लक्ष करीत दुसरा डोस लावला. थोड्यावेळाने अनुसया पारधी घरी येऊन मुलगा विजय पारधी याला याबाबतची माहिती दिली. विजय पारधी याने शहानिशा करण्यासाठी हाताच्या खाद्यांची पाहणी केली असता इंजेक्‍शनचे दोन चिन्ह उमटलेले दिसले. शाळेत जाऊन या संदर्भात आरोग्य सेविका मेश्राम यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही. पण वरिष्ठांना या संदर्भात माहिती दिली. अनुसया पारधी यांची प्रकृती स्थिर आहे की, काही वाईट परिणाम झाले का याची चाचपणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा वैद्यकीय अधिकारी व चमू पारधी यांच्या घरी आली व तपासणी करून प्रकृती स्थिर असल्याचे सांगत मुख्यालयी परत गेले. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर 15 दिवसांत प्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होत असते. अनुसया पारधी यांना एकाच वेळी दोन डोस आरोग्य सेविकेने लावल्याने काय परिणाम होईल, याची भीती मुलगा विजय पारधी यांना आहे. दरम्यान, निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य सेविकेवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्याने केली आहे. तसेच 15 दिवसानंतर कोणते वाईट परिणाम होतात, यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही त्याने दिली आहे.

गिधाडी येथे घेतलेल्या लसीकरण केंद्रात कोणत्याही महिलेला दोन डोस दिले गेले नाही. त्या महिलेने 7 तासानंतर दोन डोस घेतल्याची माहिती दिली. पण, असे झाले नाही. तिची प्रकृती ठणठणीत आहे.
- डॉ. रमेश दुधावार, प्राथमिक आरोग्य केंद्र, चोपा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com