Woman Alleges Misconduct by MSRTC Conductor
esakal
बुलडाणा : वाशिम ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील एका वाहकावर महिला प्रवाशाशी गैरवर्तन व विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित वाहकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.