पती नक्षलविरोधी अभियान राबवून घरी परतले; पत्नीच्या डोक्‍यात काय सुरू होते देव जाणे...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

लागलीच त्यांना चंद्रपूरच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्‍टरांनी संगीता यांना मृत घोषित केले. एका पोलिस उपनिरीक्षकाच्या पत्नीने बंदुकीतून गोळ्या झाडून असा टोकाचा निर्णय घेतल्याने गडचिरोली जिल्ह्यात व पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. 

गडचिरोली : नाव धनराज शिरसाठ... पेशाने पोलिस... पद पोलिस उपनिरीक्षक... गडचिरोली जिल्हा पोलिस दलाअंतर्गत येणाऱ्या मुलचेरा येथे कार्यरत... आपली ड्युटी बजावून ते घरी आले... फ्रेश झाल्यानंतर आई-वडिलांना घेऊन ते घराबाहेर पडले... हीच संधी साधून पत्नीने टोकाचे पाऊल उचलले... मुलांनी आरडाओरड केल्याने घटनाक्रम उघडकीस आला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज शिरसाठ हे गडचिरोली जिल्हा पोलिस दलाअंतर्गत येणाऱ्या मुलचेरा येथे पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पत्नी संगीता, दोन मुले व आई-वडिलांसह ते मुलचेरा येथेच वास्तव्यास आहेत. काल नक्षलविरोधी अभियान राबवून ते घरी परतले आणि आपल्या आई-वडिलांना घेऊन काही कामानिमित्त घराबाहेर पडले.

हेही वाचा - पतीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

यावेळी घरी पत्नी आणि दोन मुले होते. दुपारच्या सुमारास पत्नी संगीता यांनी पती धनराज यांची बंदूक घेतली आणि स्वतःवर गोळी झाडली. यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लागलीच त्यांना चंद्रपूरच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्‍टरांनी संगीता यांना मृत घोषित केले. एका पोलिस उपनिरीक्षकाच्या पत्नीने बंदुकीतून गोळ्या झाडून असा टोकाचा निर्णय घेतल्याने गडचिरोली जिल्ह्यात व पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. 

मुलांनी केली आरडाओरड

संगीता धनराज शिरसाठ यांचे पती कर्तव्य बजावून घरी परत आले. काही कामानिमित्त ते आई-वडिलांसह परत घराबाहेर पडले. यामुळे घरी पत्नी व दोन मुलंच होते. संगीता यांच्या डोक्‍यात कोणता विचार सुरू होता की त्यांनी पतीची बंदूक घेत स्वत:वर गोळी झाडली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन्ही मुलांनी आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यांना संगीता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.

सविस्तर वाचा -  प्रसूतीपूर्वी केलेल्या चाचणीत अहवाल आला निगेटिव्ह... चिमुकला जन्मतःच रडला अन्‌ डॉक्‍टर म्हणा

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

संगीता पती धनराज, दोन मुलं आणि सासू-सासऱ्यांसह राहत होत्या. त्यांचा आनंदाचा संसार सुरू होता. मात्र, अचानक असे काय झाले की संगीता यांनी गोळी झाडून आत्महत्या केली, हे कुणालाही समजले नाही. कौटुुंबीक कलहातून त्यांनी आत्महत्या केली का?, याचा पोलिस तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman shot herself at Gadchiroli