अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून सुशिक्षित महिला गेली मोबाईल रिचार्ज करायला अन् झाले उलटेच ...वाचा पुढे

file photo
file photo

अमरावती : मोबाईल रिचार्जचा प्रयत्न करणाऱ्या शहरातील महिलेने तोतयाने सांगितल्यानुसार कृती केली. त्यामुळे तिला तब्बल 85 हजार रुपयांचा फटका बसला. फसवणूक झालेली महिला रवीनगर भागातील रहिवासी आहे.

सायबर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तोतयाविरुद्ध सोमवारी (ता. तीन) सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जनजागृतीनंतरही सायबर क्राइम वाढत आहे. बरेच जण शॉपमध्ये जाऊन रिचार्ज न करता ऑनलाइन रिचार्ज व्यवस्था स्वीकारत आहेत. महिलेने शनिवारी (ता. एक) मोबाईल रिचार्ज केला. परंतु रिचार्ज झाला नाही. त्यामुळे त्यांनी मोबाईल कंपनीचा ई-मेल आयडीचा शोध घेऊन मेल पाठविला. त्यानंतर ८५१४०६७९७४ या क्रमांकाच्या मोबाईलवरून एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला.

ॲप डाउनलोड केल्याने झाला घात

संपर्क साधणाऱ्याने स्वत:ला मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असून रिचार्जचे पैसे परत करण्याचे आश्‍वासनसुद्धा दिले. त्यासाठी तोतयाने त्या सुशिक्षित महिलेस क्‍यूक सपोर्ट ॲप डाउनलोड करण्याचा सल्ला देऊन त्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यास सांगितले.

बॅंकखात्यामधून ८५ हजारांची रोकड बेपत्ता

महिलेने सर्वच ऑर्डरनुसार काम केले. त्यानंतर काही मिनिटांत महिलेच्या बॅंकखात्यामधून ८५ हजारांची रोकड एका झटक्‍यात बेपत्ता झाली. पीडित महिलेने सोमवारी (ता. तीन) सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली असता गुन्हा दाखल झाला.


अनोळखी व्यक्तींचे आदेश पाळू नये
असले ऍप डाउनलोड करताच आपली खासगी गोपनीय माहिती तोतयांपर्यंत सहज पोहोचते. त्यातून सुशिक्षित नागरिकांची फसवणूक होते. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीचे असे आदेश पाळू नये.
- प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे. अमरावती.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com