esakal | पेरणी करायला गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती
sakal

बोलून बातमी शोधा

dead

पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील (kurkheda of gadchiroli) एका शेतात महिलेचा गळा चिरून खून (gadchiroli crime) केल्याची घटना उघडकीस आली आहे. शीलाबाई पुंडलिक कासारे (वय ५५) रा. कुरखेडा, असे मृत महिलेचे नाव आहे. (women dead body found at farm in kurkheda of gadchiroli)

हेही वाचा: दुचाकीवरून विद्यार्थिनीचे अपहरण, दोघांचा अत्याचार

प्राप्त माहितीनुसार, शीलाबाई कासारे हिची कुरखेडा - वाकडी मार्गावर सती नदीच्या काठाजवळ पट्ट्याने मिळालेली शेती आहे. रविवारी (ता. ४) ती आपल्या दोन्ही मुलांसह शेतावर पेरणीसाठी गेली होती. दुपारी दोन्ही मुले घरी आली. पण, शीलाबाई शेतातच होती. संध्याकाळ होऊनही आई घरी न आल्याने एका मुलाने शेतात जाऊन बघितले. पण ती सापडली नाही. मध्यरात्री मुलाने संपूर्ण शेत पिंजून काढले. त्यानंतर शीलाबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. अचानक आईचा मृतदेह दिसताच मुलाने हंबरडा फोडला. त्यानंतर या घटनेबाबत कुरखेडा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून पोलिस पुढील तपास करत आहे.

दरम्यान, शीलाबाईचा पती पुंडलिक कासारे हा महिन्यांपासून एका गुन्ह्यात कारागृहात गेला आहे. त्यामुळे तर हा खून झाला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप शीलाबाईच्या खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून घटनेचा अधिक तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.

loading image
go to top