
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ४१ व्या दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखेतील पदके व पारितोषिके प्राप्त करणाऱ्या ८८ विद्यार्थ्यांपैकी ५९ विद्यार्थिनींनी पदकांवर नाव कोरत पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान दिले आहे. शिक्षणक्षेत्रात मुलींनी मारलेली बाजी लक्षणीय ठरण्यासोबतच आगामी काळ महिलांचाच असेल, असे संकेत दिले आहेत.