Maharashtra Politics: सहा जि.प.वर राहणार नारीशक्तीची सत्ता; अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश
women empowerment: विदर्भातील नऊ जिल्हा परिषदांच्या आरक्षण सोडतीत महिलांना मोठा वाटा मिळाला आहे. अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्हा परिषदांवर महिला अध्यक्ष विराजमान होणार आहेत.
नागपूर : विदर्भातील नऊ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच होणार आहे. यासाठी अध्यक्षपदांची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. हे आरक्षण अडीच वर्षांसाठी राहणार आहे.