esakal | Video : कुणी वाहनाने, तर कुणी पायी, घराच्या ओढीने निघाले मजुरांचे लोंढे
sakal

बोलून बातमी शोधा

chandrapur

टळटळीत उन्हात हे लोक डोक्‍यावर ओझे आणि खांद्यावर मुलांना घेऊन पायदळ आपल्या गावाकडे निघाले आहेत. उन्हापासून बचावासाठी झाडाखाली, रस्त्यावरच्या बसस्थानकात आश्रयाला आहेत. असे अनेक मजूर-कामगार तेलंगणातून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले असून, सीमेवर मदतीची वाट बघत आहेत. राज्यातील सुमारे 25 हजार मजूर तेलंगणात गेले आहेत.

Video : कुणी वाहनाने, तर कुणी पायी, घराच्या ओढीने निघाले मजुरांचे लोंढे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) :  परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यानंतर राज्य शासनाने त्यांना आणण्याचे नियोजन सुरू केले. मात्र, त्याआधीच तेलंगणातील हजारो मजुरांचे लोंढे आपआपल्या सोयीने सीमावर्ती भागातील पोडसा गावात पोहोचले. याची माहिती कळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्रॅव्हल्सची व्यवस्था केली. रविवारी हजारो मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. पण, अद्यापही हजारो मजूर गावाकडे पोहोचण्यासाठी आतूर आहेत. शेतातच डेरा टाकून ते स्वयंपाक बनवीत आहेत.


लॉकडाऊन देशात कायम असले तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे चार हजार मजूर रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात पोडसा सीमेवर आले. तेलंगणा सरकारने या मजुरांना जाण्याची परवानगी दिली. मात्र, वाहनांची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळं पदरचे पैसे खर्च करून या मजुरांनी भाड्याने वाहने केली आणि सीमेपर्यंत आले. गोंडपिंपरी तालुक्‍यातील पोडसा पुलावरून हे सर्व मजूर रविवारी महाराष्ट्रात म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. मिरची तोड करण्यासाठी तेलंगणात हजारो मजूर दरवर्षी जातात. पण यावेळी कोरोना संकटामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. या लोकांना गावाबाहेर राहावे लागले. लहान-लहान मुले घेऊन या लोकांनी दीड महिना तेलंगणात कसातरी घालवला. आता आपल्या राज्यात परतल्यावरही त्यांच्या यातना कमी होताना दिसत नाही. टळटळीत उन्हात हे लोक डोक्‍यावर ओझे आणि खांद्यावर मुलांना घेऊन पायदळ आपल्या गावाकडे निघाले आहेत. उन्हापासून बचावासाठी झाडाखाली, रस्त्यावरच्या बसस्थानकात आश्रयाला आहेत. असे अनेक मजूर-कामगार तेलंगणातून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले असून, सीमेवर मदतीची वाट बघत आहेत. राज्यातील सुमारे 25 हजार मजूर तेलंगणात गेले आहेत.

सविस्तर वाचा - तुम्ही रोगयुक्‍त फळे तर खात नाही ना?
अशातच रविवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचा ताफा दुपारनंतर पोडसा सीमेवर धडकला. राज्याच्या सीमेवर जमलेल्या गर्दीचे त्यांनी सांत्वन केले. अखेर जमलेल्या मजुरांना स्वगृही परतण्यासाठी मदत करणार असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले व प्रशासनाला प्रत्येक मजुराची जेवणाची व्यवस्था करण्याचे देखील आदेश दिले.  

loading image
go to top