
Amravati Case : यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडेंना उत्तर; तुम्ही ना...
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) येथे झेंडा काढण्यावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन गटात मोठा राडा झाला होता. या घटनेमागे मास्टरमाइंड राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) असल्याचा आरोप भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला होता. डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) हे युवकांना भडकवत आहेत, असे प्रत्युत्तर यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिले. आता आरोप प्रत्यारोपांमुळे अमरावती जिल्ह्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
अचलपूर शहरातील खिडकी गेट आणि दुल्हागेट येथील ब्रिटिशकालीन दरवाजांवर दरवर्षी सण-उत्सवप्रसंगी शहरातील नागरिक झेंडे व फ्लेक्स लावतात. यावर्षीसुद्धा झेंडे लावले होते. मात्र, रविवारी सायंकाळी दहा वाजताच्या सुमारास तेथील झेंडा काढल्याने वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत बदलून दोन गटात मोठा राडा झाला होता. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेकही केली होती.
हेही वाचा: प्रशांत किशोर यांच्या पदाबाबत सोनिया गांधी घेणार निर्णय!
अचलपूरच्या घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, घडलेल्या घटनेमागे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या मास्टरमाईंड आहेत. १२ नोव्हेंबर रोजी घडलेली घटना, त्यानंतर मातंग समाजाच्या मुलांनी काश्मीर फाईल बघितल्यानंतर केलेल्या ‘भारत माता की जय’ घोषणेनंतर झालेला हल्ला या सर्व घटनांमागे यशोमती ठाकूर याचा हात असल्याचा आरोप बोंडे (Anil Bonde) यांनी केला होता.
वातावरण चिघळवण्याचे काम
अनिल बोंडे हे विक्षिप्त वागत आहेत. ते कुणाच्या खुंट्याला बांधले गेले आहेत हे जनतेला माहीत आहे. ते लोकांना भडकवत आहेत. अमरावतीमधील सलोखा कायम राहिला पाहिजे, यासाठी प्रयत्न करीत आहोत. परंतु, अनिल बोंडे हे वातावरण चिघळवण्याचे काम करीत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही, असे अनिल बोंडे यांना उत्तर देताना यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.
Web Title: Yashomati Thakur Anil Bonde Amravati District Dispute Over Flag Removal Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..