नवनीत जीऽऽ केंद्र सरकारच्या धोरणामुळे रखडला स्कायवॉक

नवनीत जीऽऽ केंद्र सरकारच्या धोरणामुळे रखडला स्कायवॉक

अमरावती : काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thakare) यांना पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी चिखलदऱ्यातील स्कायवॉकला (Skywalk) हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या; पण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण विधान करा असे म्हटले होते. यामुळे नवनीत राणा यांनी पुन्हा शिवसेनेचा चिमटा तर नाही काढला ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Guardian Minister Adv. Yashomati Thakur) यांनी उत्तर देत केंद्र सरकारने अडथळा आणल्यानेच स्कायवॉक प्रकल्प अपूर्ण राहिल्याचे म्हटले आहे. (Yashomati-Thakur-said-that-people's-representatives-should-not-be-misled-by-giving-wrong-information)

‘‘आदित्यजी... आपण राज्याचे पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. वाटत असेल तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यातील स्कायवॉकलाही माननीय शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, मात्र; काम लवकरात लवकर पूर्ण करा’’, असे पत्र खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिले होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी चिखलदरा दौऱ्यावर रखडलेल्या स्कायवॉकची पाहणी केली आणि वरील भाष्य केले.

नवनीत जीऽऽ केंद्र सरकारच्या धोरणामुळे रखडला स्कायवॉक
मास्कशिवाय नवरीला घ्यायला जाणे पडले महागात; नवरदेवाला दंड

चिखलदऱ्यातील स्कायवॉक हा प्रकल्प केंद्र सरकारने अडथळा आणल्याने अपूर्ण राहिला आहे. याला राज्य सरकार जबाबदार नाही. राज्य सरकारने हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या आहेत. परंतु, केंद्र सरकारच्या धोरणामुळे प्रकल्पात अडथळे येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार, अशी माहिती अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

लोकप्रतिनिधींनी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये. जनहिताच्या प्रकल्पांनावरून राजकारण करू नये. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. इथले निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नीट पाहता यावे यासाठी सरकारने इथे स्कायवॉक तयार करण्याचे निर्णय घेतला आहे. या स्कायवॉकचे काम यावर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, केंद्र सरकारने सहकार्य न केल्याने प्रकल्प अपूर्ण राहिल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

नवनीत जीऽऽ केंद्र सरकारच्या धोरणामुळे रखडला स्कायवॉक
फडणवीसांच्या नेतृत्वातच ओबीसी आरक्षणाची मागणी करू - वडेट्टीवार

जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक

जगातील सर्वाधिक लांबीचा स्कायवॉक हा विदर्भाच्या नंदनवनात चिखलदरा येथे उभारला जात आहे. गोराघाट ते हरिकेन या दोन पॉइंटदरम्यान उभारण्यात येणाऱ्या या स्कायवॉकची लांबी ५०० मीटर असणार आहे. हा स्कायवॉक अनब्रेकेबल काचेचा असणार आहे. याची उंची १,५०० फुटापेक्षा अधिक असेल.

(Yashomati-Thakur-said-that-people's-representatives-should-not-be-misled-by-giving-wrong-information)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com