

Yavatmal
esakal
आर्णी: जीवे मारण्याची धमकी देत एका ५४ वर्षीय नराधमाने १३ वर्षीय पीडितेवर वारंवार अत्याचार केला. यात पीडिता ही १९ आठवड्याची गर्भवती झाली. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी नराधमाला अटक केली. न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिगांबर काळू जाधव (वय ५४ रा. कोळशी तांडा ता. दिग्रस) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.