

Yavatmal
esakal
यवतमाळ: खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणे प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हमी देत निकृष्ट आणि अप्रमाणित सोयाबीन बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी 'बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रा. लि.' (गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना) या कंपनीविरुद्ध बाभूळगाव पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.