

Yavatmal News
esakal
यवतमाळ: हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांची विक्री तसेच धर्मांतर करण्याचे मोठे रॅकेट राळेगाव मतदारसंघात सक्रिय असून मागील सहा महिन्यांत ३४ आदिवासी मुलींची तस्करी झाली असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांनी केला आहे. यासाठी त्यांनी एका ‘ऑडिओ क्लिप’चा दाखला दिला आहे. या आरोपांची दखल आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी घेऊन शनिवारी (ता. १८) रात्री उशिरा अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. ऑडिओ क्लिपमध्ये नाव असलेल्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.