esakal | काँग्रेसच्या जम्बो कार्यकारीणीवर शिक्कामोर्तब; 33 उपाध्यक्ष, 76 सरचिटणीस तर 86 चिटणीस
sakal

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612267829310,"A":[{"A?":"I","A":30.9672102446943,"B":54,"D":151.0298902723031,"C":46.06557951061141,"a":{"B":{"A":{"A":"MAEUgVBUjzk","B":1},"B":{"A":-1.8438436

जिल्हा काँग्रेस कमेटीचे गठन राहीले होते. त्यामुळे कार्यकारीणी जाहीर करण्यात विलंब झाला. सर्वसमावेशक तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वांना समान संधी देण्याचे काँग्रेसचे धोरण होते. परिणामी, नावे अंतिम करण्यात उशीर झाला. 

काँग्रेसच्या जम्बो कार्यकारीणीवर शिक्कामोर्तब; 33 उपाध्यक्ष, 76 सरचिटणीस तर 86 चिटणीस

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : बहूप्रतिक्षेनंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरुन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी जिल्हा काँग्रेस कमीटीची जम्बो कार्यकारीणी जाहीर केली.  कार्यकारणीत तब्बल 33 उपाध्यक्षांचा समावेश आहे. याशिवाय 76 सरचिटणीस तर 86 चिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - "ओ मामी, बजेटवर एक रॅप साॅंग लवकर घेऊन या"; अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल 

जिल्हा काँग्रेस कमेटीचे गठन राहीले होते. त्यामुळे कार्यकारीणी जाहीर करण्यात विलंब झाला. सर्वसमावेशक तसेच आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वांना समान संधी देण्याचे काँग्रेसचे धोरण होते. परिणामी, नावे अंतिम करण्यात उशीर झाला. 

आगामी नगरपालिका निवडणुका लक्षात घेता शहरी भागाला जास्त प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. ग्रामीण भागाचे प्रतिनिधी कार्यकारणीत महत्वाच्या पदावर संधी देण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसने तब्बल 276 सदस्याचंी जिल्हा कार्यकारीणी गठीत केली आहे. 33 उपाध्यक्ष असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तातु देशमुख यांचा समावेश आहे. 

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

कोषाध्यक्ष म्हणुन राजीव निलावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद वाढोणकर, आरीज बेग, संजय ठाकरे यांची प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीत 76 सरचिटणीस, 86 चिटणीस, 17 सहसचिव, 12 कार्यकारीणी सदस्य, 17 तालुकाध्यक्ष, 10 पदसिद्ध निमंत्रीत, 22 विशेष निमंत्रीत सदस्यांचा समावेश आहे. निमंत्रीत सदस्यामध्ये आजी माजी खासदार-आमदार, आजी माजी मंत्री यांचा समावेश आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी मंगळवार (ता.दोन) कार्यकारीणी जाहीर केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image