

Yavatmal
esakal
यवतमाळ: मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकर्यांनी कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे धाव घेतली आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल साडेनऊ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज असून त्यातील जवळपास 50 टक्के म्हणजे चार लाख 55 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.