यवतमाळ : तरुणाच्या खूनप्रकरणी दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल

त्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद आर्णी पोलिस ठाण्यात देण्यात
यवतमाळ : तरुणाच्या खूनप्रकरणी दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल
यवतमाळ : तरुणाच्या खूनप्रकरणी दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखलsakal
Updated on

आर्णी : तालुक्यातील देवगाव धरणावर पार्टी करण्यासाठी गेलेल्या एका तरुण मित्राला दोघांनी मारहाण करीत बेशुद्ध अवस्थेत विहिरीत फेकून दिले. त्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद आर्णी पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फरार असलेल्या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत.

पुरूषोत्तम दिगंबर ढोके (वय ३०, रा. देवगाव) असे मृताचे नाव आहे, तर संतोष सेवाराम राठोड (वय ३५, रा. देवगाव) व मनोज फुलसिंग राठोड (वय ३२, रा. विठाळा ता. दिग्रस) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पुरुषोत्तम ढोके तीन मित्रांसह १२ सप्टेंबर २०२१ रोजी पार्टी करण्यासाठी देवगाव धरणावर गेला होता. त्याचवेळी त्याला मारहाण करून विहिरीत फेकून दिल्याने, त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, तो बेपत्ता झाल्याचे व विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याच्या मित्रांनी केला होता.

यवतमाळ : तरुणाच्या खूनप्रकरणी दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : भरणेंनी घेतला अधिवेशनाच्या तयारीचा आढावा

घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी गजानन गोदमले यांच्या शेतातील विहिरीत पुरुषोत्तमचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनास्थळावरच पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, आर्णी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संतोष व मनोज यांनीच संगनमत करून पुरुषोत्तमला बेदम मारहाण केली व बेशुद्ध झाल्यानंतर विहिरीत फेकून दिले. त्यात त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे कपडे व मोबाईल कुठेतरी फेकून दिला. याबाबतची फिर्याद पोलिस जमादार अरुण सीताराम पवार यांनी आर्णी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २८) दिली. त्यावरून संतोष राठोड व मनोज राठोड यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले, जमादार अरुण पवार व संजय भारती तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com