

Mahagaon police arrest a suspect while investigating an alleged case of exploitation of a woman.
esakal
महागाव (जि. यवतमाळ): मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या २९ वर्षीय महिलेवरील कथित अत्याचाराच्या प्रकरणात महागाव पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. रुग्णालयाकडून मिळालेल्या पत्रानंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला.
सोमेश ऊर्फ सोमनाथ ऊर्फ डॉन रमेश पुंडे (वय २७, रा. वेणी धरण, ता. महागाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.