यवतमाळ : टँकर उलटला; हजारो लिटर डिझेल मातीत

भरधाव टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले.
टँकर उलटला; हजारो लिटर डिझेल मातीत
टँकर उलटला; हजारो लिटर डिझेल मातीतsakal
Updated on

यवतमाळ : भरधाव टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या अपघातामुळे टँकरमधील हजारो लिटर डिझेल मातीत मिसळले गेले. ही घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी १२ वाजता येथील पांढरकवडा मार्गावरील येरद (शरद) गावाजवळील जामडोह शिवारात घडली.

डिझेल घेऊन टँकर चंद्रपूरला जात होता. जामडोह गावाजवळ चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. टँकर रस्त्यावरील विजेच्या खांबाला धडकून रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने यावेळी वीजतार तुटून विजेची ठिणगी पडली नाही; अन्यथा मोठा स्फोट होऊन दुर्घटना झाली असती, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. या अपघातात चालक व वाहक दोघेही जखमी झाले. तर, हजारो लिटर डिझेल वाहून मातीत मिसळले. घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंदविला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Japtalai Ashram School
Samruddhi Expressway Container Action
Melghat Ashram School Student Health Row
Chandrapur Midday Meal Scheme
Marathi News Esakal
www.esakal.com