
पांढरकवडा : बनावट सेंद्रीय उत्पादने, किटकनाशके व खते विनापरवाना बाळगून त्यांची शेतकऱ्यांमध्ये विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून साडेसात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. बनावट खत, किटनाशक विक्रीचा पर्दाफाश करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
जावेद अन्सारी व दिनेश कुंटलवार, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तालुका कृषी अधिकारी राहुल दासरवार यांना जावेद गुलाब मुस्तफा अन्सारी (रा. दातपाडी) व दिनेश विलास कुंटलवार (रा. आकोली (खु.)) हे पांढरकवडा शहरात ’माय सनराईज मार्केटींग अॅन्ड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लि’.नावाची मार्केटींग कंपनी स्थापून सेंद्रीय उत्पादने भासवून बनावट किटकनाशके व खते विनापरवाना बाळगत असून ते शेतकऱ्यांमध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पांढरकवडा पोलिसांची मदत घेत या कंपनीच्या शास्त्रीनगर येथील बेतवार यांच्या घरी असलेल्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी बियाणे, खते आढळून आले. तसेच ते बाळगण्याचा व विक्री करण्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे नव्हता.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी शास्त्रीनगरातील नार्लावार यांच्या घरी माल असल्याचे सांगितले. खोलीत खलनायक ऑरगेनिक हेरबीसीड, अमृत पावडर, सुपर ग्रोथ, सुपर स्ट्राइकर यांसारखे आठ उत्पादने सापडली. या आठ उत्पादनांची ३५२ नग असा सहा लाख रूपये किमतीचा मुद्देमाल, लॅपटाप व कलर प्रिंटर आणि अनधिकृत बियाणे विक्री केल्याचे पाच बिलबूक, असा एकूण सात लाख सतरा हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
किरायाच्या खोलीतच सुरू होते उत्पादन
बनावट सेंद्रीय उत्पादने हे बेतवार लेआउटमधील कल्पना मंडाले यांच्या घरी भाड्याने घेतलेल्या खोलीतच तयार करायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.