

Farmer Loan Waiver Crises
esakal
उमरखेड (जि.यवतमाळ): शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने, सततची नापिकी, थकीत पीककर्ज आणि पत्नीच्या उपचाराची आर्थिक विवंचना या संकटांनी ग्रासलेल्या उमरखेड तालुक्यातील अंबाळी येथील अल्पभूधारक शेतकरी रामकृष्ण साहेबराव दांडेगावकर (वय ४३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. ७) रोजी पोफाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हर्षी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण दांडेगावकर यांच्या नावावर अंबाळी शिवारातील गट