Yavatmal News : दुष्काळ पाहणीला गेलेल्या मंत्र्यांचा ताफा शेतकर्‍यांनी अडविला! घारफळ येथे संतापाचा उद्रेक

पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात सापडलेली असताना दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या मंत्र्यांच्या ताफ्यासमोरच शेतकर्‍यांचा संताप उफाळून आला.
Farmers blocked the convoy of ministers visiting to assess drought conditions.

Farmers blocked the convoy of ministers visiting to assess drought conditions.

sakal

Updated on

यवतमाळ - पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात सापडलेली असताना दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या मंत्र्यांच्या ताफ्यासमोरच शेतकर्‍यांचा संताप उफाळून आला. मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके पीक परिस्थितीची पाहणी करीत असताना घारफळ येथे संतप्त शेतकर्‍यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडविला. पिके हातची गेली असताना वीजपुरवठ्याच्या समस्येनेही शेतकर्‍यांना त्रस्त केले असल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com