Yavatmal Hailstorm: यवतमाळ जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी हवालदिल, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
Crop Damage: यवतमाळ जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसाने गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटामुळे तातडीची मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.