

Yavatmal
esakal
नेर : चक्क शाळेच्या वेळेतच मुख्याध्यापिका अत्यंत गाढझोपेत आढळून आल्याचा आरोप तालुक्यातील खंडाळा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर ढोके यांनी गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्याकडे लेखी तक्रार दिली. दरम्यान, संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले असून, संबंधित शिक्षिकेची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली.