
Yavatmal Crime
sakal
देवळी : तालुक्यातून अवैध वाळू व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. या वाळू घाटाच्या सीमा वादातून वाळू व्यावसायिकांमध्ये वाद होऊन एकाची सुनियोजित हत्या करण्यात आली. रवींद्र अशोक पारिसे (वय ५०, रा. अंदोरी आंजी) याची आंजी (अंदोरी) येथील वाळू व्यावसायिक रोहन देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी अंदोरी येथून दोन किमी अंतरावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एबी बारवर चाकूने भोसकून क्रूर हत्या केली. सोमवारी (ता. २०) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.