Yavatmal News : पुण्यातील खून प्रकरणातील आरोपीला यवतमाळात अटक
Crime News : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून पुण्यात दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये पंकज तायडेचा मृत्यू झाला असून, निखील गेडामला यवतमाळमधून अटक करण्यात आली.
यवतमाळ : पुण्यातील हिंजेवाडी पोलिस ठाण्यांतर्गत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.