Yavatmal: भाजपच्या दबावतंत्रापुढे शिंदेसेना झुकली?; अखेरच्या क्षणी उमेदवार बदल; चतुर्वेदींच्या नावावर शिक्कामोर्तब

Mahayuti Faces Internal Conflict Over Candidature: यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीवरून महायुतीतील संघर्ष उघड झाला. अखेरच्या क्षणी उमेदवार बदलत दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेला संघर्ष अखेर नामांकनाच्या शेवटच्या दिवशी उघडपणे समोर आला. भाजपच्या दबावतंत्रामुळे शिंदेसेनेला ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अखेर पालकमंत्री संजय राठोड यांच्या ‘मनातील’नाव मागे पडत माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. सोमवारी (ता. एक) अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी दहा नामांकन दाखल केले आहे. यात शिंदेसेना, भाजप, काँग्रेस तसेच अपक्षांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com