यवतमाळच्या "बुढीच्या चिवड्या'ची चव चटकदार

राजकुमार भीतकर
बुधवार, 12 डिसेंबर 2018

यवतमाळ, ता. 11 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना सोमवारी (ता. 10) असीम सरोदे यांच्या पुणे येथील घरी अनोखा पाहुणचार देण्यात आला. यवतमाळ येथील प्रसिद्ध "बुढीचा चिवडा', विदर्भातील सांबारवडी, दहीभात, गाजराचा हलवा असा बेत होता. यावेळी यवतमाळच्या बुढीच्या चिवड्याची चव चटकदार असल्याचे अरुणा ढेरे म्हणाल्या. जेवणासोबत मस्त गप्पांची मैफल आणि हास्याचे कारंजे असे वातावरण रंगत गेले. ज्येष्ठ सामाजिक विचारवंत विद्या बाळ, डॉ. विश्‍वंभर चौधरी, डॉ. मंगल दुकले तसेच ऍड.

यवतमाळ, ता. 11 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना सोमवारी (ता. 10) असीम सरोदे यांच्या पुणे येथील घरी अनोखा पाहुणचार देण्यात आला. यवतमाळ येथील प्रसिद्ध "बुढीचा चिवडा', विदर्भातील सांबारवडी, दहीभात, गाजराचा हलवा असा बेत होता. यावेळी यवतमाळच्या बुढीच्या चिवड्याची चव चटकदार असल्याचे अरुणा ढेरे म्हणाल्या. जेवणासोबत मस्त गप्पांची मैफल आणि हास्याचे कारंजे असे वातावरण रंगत गेले. ज्येष्ठ सामाजिक विचारवंत विद्या बाळ, डॉ. विश्‍वंभर चौधरी, डॉ. मंगल दुकले तसेच ऍड. असीम सरोदे, रमा सरोदे आणि त्यांचा मुलगा रिशान अशा कौटुंबिक वातावरणात यवतमाळच्या पाहुणचाराचा आनंद पुणेकर अरुणा ढेरे यांनी घेतला.
विदर्भातील फ्लोरिसिसच्या आजाराचा प्रश्‍न, पिण्याच्या पाण्याची बिघडलेली व प्रदूषित भूजल पातळी, कुमारीमाता व अन्यायाचे वास्तव, खारपाण पट्टा व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासी समाजातील कुरुमघर प्रथा आणि पाळीदरम्यान स्त्रियांवर होणारे अन्याय तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयवार त्यांनी उद्‌घाटनपर भाषणात बोलावे, आदी विषयांवर चर्चा झाली. कारण जर डोक्‍याची, मनाची स्वस्थता नसेल तर साहित्य ऊर्मी कुंठित होते, असा मुद्दा ऍड. असीम सरोदे यांनी मांडला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जात, धर्म, राजकीय भूमिका, आर्थिक परिस्थिती आणि व्यक्तीचे समाजातील स्थान न बघता वापरता येईल, अशी परिस्थिती अजूनही नाही. याबद्दल डॉ. ढेरे यांनी खंत व्यक्त केली.

Web Title: yavatmal news