
शहरातील वंजारी फैल परिसरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अघोरीकृत्य करण्यात येते होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत त्या मुलीसह तिच्या आईची त्या मात्रीकाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. ही घटना सोमवार, दि. ७ जुलैला दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून त्या मात्रीकाने स्वत:च्या गळ्यावर चाकुने वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महादेव परसराम पालवे असे त्या मात्रीकाचे नाव असून त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.