पूजा-ममतासाठी अख्खे गावच बनले वऱ्हाडी

गजानन वैद्य
बुधवार, 11 एप्रिल 2018

यवतमाळ  : फुलसावंगी येथून जवळच असलेले चिल्ली (ईजारा ता. महागाव) हे दोन हजारांवर लोकसंख्या असलेले एक छोटसं गाव. तेथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती व मजुरी. बोटावर मोजण्याइतकेच लोकं सरकारी नोकरीत. सर्व समाजाचे व जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. सर्व सण एकत्रच साजरे करतात. याच गावाने पितृछत्र हरविलेल्या दोन मुलींचा विवाह स्वखर्चाने करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. खरं तर या दोघींच्या लग्नासाठी अख्खं गावच वऱ्हाडी बनलं होतं.

चिल्ली (ईजारा) येथील रहिवासी असलेले बंडू तुकाराम तरटे (वय 40) या शेतमजुराच्या या दोन्ही कन्या. गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंडू तरटे हे आंध्र प्रदेशात मोजमजुरी करण्यासाठी गेले होते. परंतु, तेथे त्यांची तब्येत बिघडली. म्हणून बंडू तरटे आपल्या गावाकडे परत आले. यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना गेल्या 29 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर काळाने झडप घातली.
तरटे यांच्या पश्‍चात चार मुली, दोन मुले, पत्नी असा परिवार. पोरक्‍या झालेल्या या आदिवासी कुटुंबाला गावकऱ्यांनी धीर दिला. त्यांच्या दोन उपवर मुलींचा विवाहाचा भार गावकऱ्यांनी उचलला. मोठी मुलगी पूजा हिचा विवाह येथून जवळच काळी (टेंभी ता. महागाव) येथील विष्णू इंगळे याच्याशी व ममता हिचा विवाह गणपत सुरकुंडे (रा. मोहपूर ता. किनवट जि. नांदेड) याच्याशी लावला. गेल्या आठ एप्रिलला चिल्ली येथे हा विवाह सोहळा समस्त गावकरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दोन्ही जोडप्यांना गावकऱ्यांनी संसारोपयोगी साहित्य भेट दिले. ऑटो संघटना, संत साधू महाराज गावकरी मंडळ चिल्ली व सुदाम जाधव (मास्टर) यांनी यासाठी मोलाचे योगदान दिले.

Web Title: Yavatmal weeding news