

Yavatmal
esakal
यवतमाळ: चारित्र्यावर संशय घेऊन तलवारी सारख्या लोखंडी हत्याराने पत्नीचा खून करणार्या पतीला न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दलुराम गुलाब राठोड (वय 59, रा. यावली, ता. यवतमाळ), असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. बीएनएसएस कायद्यांतर्गत अवघ्या नऊ महिन्यात निकाली निघालेली ही पहिली घटना आहे.