Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

जिल्हा परिषद कर्मचारी गट क, संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या 2014 च्या शासन निर्णयानुसार करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत.
yavatmal zp

yavatmal zp

sakal

Updated on

यवतमाळ - जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रक मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी काढले आहे. सहा मार्चपर्यंत सेवा ज्येष्ठता याद्या उपलब्ध करून द्याव्या, असे पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रक्रिया आटोपून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात कुठल्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याचेही आदेशात नमूद आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com