Wardha Crime: कर्जाच्या विवंचनेतून २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन, संपवले जीवन
Crime News: वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास लावून जीवन संपवले. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पवनार (जि. वर्धा) : येथील रोशन वसंत सोनटक्के (वय २९) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घराच्या वरच्या माळ्यावरील गोडाऊनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.