पिस्तुलातून गोळी झाडून युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर : पिस्तूलमधून गोळी झाडून घेत युवकाने आत्महत्या केली. गुरुवारी रात्री अजनी हद्दीतील जयवंतनगरात ही घटना उघडकीस आली. मृतक भिसी चालवायचा. पैसे परत न दिल्याने त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. आर्थिक कोंडी त्यातच लोकांनी पैशांसाठी तगादा लावल्याने युवकाने आत्मघातकी पाऊल उचलले.

नागपूर : पिस्तूलमधून गोळी झाडून घेत युवकाने आत्महत्या केली. गुरुवारी रात्री अजनी हद्दीतील जयवंतनगरात ही घटना उघडकीस आली. मृतक भिसी चालवायचा. पैसे परत न दिल्याने त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. आर्थिक कोंडी त्यातच लोकांनी पैशांसाठी तगादा लावल्याने युवकाने आत्मघातकी पाऊल उचलले.
आशिष धर्मदास उसरे (26) असे मृताचे नाव आहे. तो मुळचा कामठीचा रहिवासी आहे. आठच महिन्यांपूर्वी त्याचे कामठीचीच रहिवासी असणाऱ्या 22 वर्षीय योगिनीसोबत लग्न झाले होते. विवाहापूर्वी तो कामठीतच भिसी चालवायचा. यातून त्याच्याकडे मोठी रक्कम जमा व्हायची. खर्चिक स्वभाव असल्याने पैशांची परतफेड करण्यात अडचणी आल्या. त्यातूनच पुढे आर्थिककोंडी निर्माण झाली. पैसे परत मिळत नसल्याने त्याच्याकडे पैसे जमा करणाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्या आधारे जुनी कामठी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात तो काही दिवस कारागृहातही राहून आल्याची माहिती आहे. बाहेर आल्यानंतर त्याच्याकडे पैसे जमा करणाऱ्यांनी पैसे परत मिळण्याकडे त्याच्याकडे तगादा लावला होता. यामुळे दोनच महिन्यांपूर्वी तो जयवंतनगरात नीलेश शर्मा यांच्याकडे भाड्याने राहण्यास आला होता. पती-पत्नी दोघेच वरच्या माळ्यावर रहायचे. काकांचे निधन झाल्याने योगीनी कामठीला गेली होती. गुरुवारी सकाळी 8 वाजता आशिष आणि योगिनीचे बोलणे झाले. यानंतर रागीनीने वारंवार फोन करूनही आशिष प्रतिसाद देत नव्हता. रागिनीने त्याच्या मोबाईलवर 25 ते 30 वेळा कॉल केले. प्रतिसाद मिळत नसल्याने योगिनी रात्री 10.30 वाजता घरी परतली. बाहेरू आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने योगिनीने घरमालकाला बोलावले. त्यांनी खिडकीच्या फटीतून बघितले असत नीलेश जमिनीवर निपचित पडला असून हातात पिस्तूल दिसून आले. लागलीच पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. माहिती मिळताच अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दार तोडून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.

पिस्तूल आले कुठून?
आशिषने आत्महत्येसाठी वापरलेले पिस्तूल आले कुठून, याचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. पिस्तुलमधून गोळी झाडल्याचा आवाज होऊनही कुणालाच कसे कळले नाही, हा सुद्धा गहण प्रश्‍न असून पोलिस सर्व दिशांनी तपास करीत आहेत. पिस्टलमध्ये दोन जीवंत राऊंडसुद्धा सापडले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide after being fired from a pistol