esakal | ‘मायक्रो फायनान्स’च्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाची आत्महत्या...

‘मायक्रो फायनान्स’च्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मारेगाव : शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील रहिवासी शेख साबुद्दीन शेख लाल (वय 42) यांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्जवसुलीसाठी होणार्‍या तगाद्याला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.15) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

हेही वाचा: राज्य सरकारला मोठा धक्का, डॉ. तायवाडे देणार आयोगाचा राजीनामा

शेख साबुद्दीन शेख लाल यांनी आपल्या घरीच विषारी द्रव्य पिऊन घेतले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत शेख साबुद्दीन यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे.

परंतु, सततच्या नापिकीमुळे शेती व्यवसाय परवडत नसल्याने शेती ठेक्याने देऊन मोलमजुरी करीत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी काही कामानिमित्त मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्जाची उचल केली होती. परंतु, हप्त्यासाठी सदर कंपनीकडून तगादा लावला जात असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मृताच्या पश्‍चात भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

loading image
go to top