पायरीवरून पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू

उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला
शरद यादोराव बुरडे
शरद यादोराव बुरडेsakal

जेवनाळा : जेवनाळा येथे राहणाऱ्या तरुणाचा घरातच सहजतेने चालताना पायरीवरून पाय घसरल्याने डोक्याला जबर मार लागला. तत्काळ उपचाराकरिता शासकीय रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च शुक्रवारी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. शरद यादोराव बुरडे (३८) राहणार कवडशी(जेवनाळा) तालुका लाखनी असे मृतकाचे नाव आहे.

शरद हा शेतकरी होता. अथक प्रयत्नाने भर तारुण्यात त्यांनी पक्के घर बांधले. मात्र हे पक्के घरच त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. घरात सहजतेने चालताना पायरीवरून पाय घसरला. डोक्याच्या भारावर एकाकी पडल्याने मेंदूला जबर जखम झाली. उपचाराकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारा दरम्यान शनिवारी दुपारी ३ वाजता शरद ने मृत्यूला कवटाळले. शवविच्छेदनानंतर जेवनाळा येथे अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे. शरद च्या एकाकी निधनाने त्यांच्याविषयी गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे.घरचा कर्ता पुरुष गेल्याने बुरडे परिवारावर दुःखाचे पहाड कोसळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com