Drowning News : सेंदुरवाफा येथील बोडीत अंघोळीस गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस आणि स्थानिकांनी दिवसभर शोध घेतला, परंतु मृतदेह मिळवण्यासाठी अधिक शोध मोहीम सुरू केली.
साकोली : सेंदुरवाफा येथे बोडीत अंघोळ करण्यास गेलेल्या युवक पाण्यात बुडाला. त्याचे नाव दिलीप शिवराम मौजे (वय ४०) असे आहे. रविवारी (ता. २२) रोजी दिवसभर बोडीत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, रात्रीपर्यंत शोध लागला नाही.