Murder Case : कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत कांद्रीतील हरडे लेआउट येथे महेंद्र बर्वे याची दगड आणि शस्त्राने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
कन्हान : कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत कांद्रीतील हरडे लेआउट येथे एका युवकाची शस्त्र आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी (ता.२४) सकाळी उघडकीस आली. महेंद्र टिकाराम बर्वे (वय ३०, सद्भावनानगर) असे मृताचे नाव असून मध्यरात्री ही घटना घडली.